Marathwada Shikshan Prasarak Mandal’s

Deogiri Institute Of Technology And Management Studies

Chhatrapati Sambhajinagar (Maharashtra) 431005

NSS

National Service Scheme

प्रस्तावना

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामजिक जाणीव निर्माण करणे व त्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास घडवुन आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली.

स्वावलंबन,चारित्रसंवर्धन व सामाजिक बांधिलकी या मुल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पध्दतीत घडवुन आणण्यासाठी महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षापासुन म्हणजे24 सप्टेबंर 1969मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयांर्गत राबविली जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन 1970-71 पासुन राष्ट्रीय सेवा योजना सुरु असुन आज विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यात 3600 स्वयंसेवक व 370 कार्यक्रमाधिकारी 220 महाविद्यालयातुन उत्कृष्टपणे कार्य करत आहेत.

2014 पासुन देवगिरी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड मॅनेजमेंट स्टडिज,औरंगाबाद या आपल्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सुरु करण्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे नियमित शिबिरासाठी 100 स्वयंसेवक व विशेष शिबिरासाठी 50 स्वयंसेवकांची परवाणगी देण्यात आली.सदरील विभाग महाविद्यालयात चालु करण्यासाठी श्री.पदमाकर काळे व मेजर डॉ.बी.एस.जाधव संरानी खुप मोठे योगदान दिले.प्रा.राजेंद्र मोतिंगे यांनी अहमदनगर येथील प्रशिक्षण शिबिरात कार्यक्रम अधिकारीचे प्रशिक्षण पुर्ण केले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाविद्यालयातील स्थापने पासुन आजपर्यंत प्रा.राजेंद्र मोतिंगे कार्यक्रम अधिकारी म्हणुन राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यभार संभाळत असुन डॉ.उमेश मालपाणी,प्रा.मिताली सोनवणे ,प्रा.योगिता जगदाळे हे त्यांना नियमित व विशेष कार्यक्रमासाठी  मदत करत असतात

2014 ते 2020 या कालवधीत सातारा-तांडा,पाटोदा,घाणेगाव,शिंदोन इत्यादी गावे दत्तक घेऊन सदरील गावामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन केले.आरोग्य तपासणी शिबिर,वृक्षारोपण,स्वच्छता मोहिम,अशे विविध उपक्रम शिबिरा दरम्यान राबविली.

राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दीष्टे

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवा करणे,आपल्या जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळुन त्यांना समजावुन घेवुन रचनात्मक कार्य करणे,समाजसेवेच्या माध्यमातुन स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे या उद्देशाने हि योजना सुरु झाली.

राष्ट्रीय सेवा योजना दिवस

प्रत्येक वर्षी 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस मानावा.त्या दिवशी विद्यापीठ पातळीवर रक्तदान शिबिर,नेत्रदान,आरोग्य शिबिर,गलिच्छ वस्ती निर्मुलन,वृक्षारोपण,जलसंवर्धन अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरुप

राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे दोन प्रकारचे कार्यक्रम राबविले जाते

1) नियमित कार्यक्रम

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षात 120 तास समाजसेवेचे काम महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या झोपडपट्टी किंवा ग्रामीण परीसरामध्ये करणे आवश्यक असते.या कार्यक्रमांतर्गा रोगप्रतिबंधक लसीकरण,एडस रोगप्रतिबंधक मार्गदर्शन,मोफत रक्तगट तपासणी शिबिर,वृक्षारोपण,रोग निदान शिबिर,ग्रामसफाई,साक्षरता,पर्यावरण,सामाजिक सामंजस्य,राष्ट्रीय एकात्मता जलसंवर्धन इ.समाज जीवनाशी निगडीत कार्यक्षेत्रात कार्य करण्यात येते.

2) विशेष शिबीर कार्यक्रम

प्रत्येक घटक  महाविद्यालयातर्फे वर्षातुन एकदा सात दिवसांचे निवासी शिबीर महाविद्यालयांनी दत्तक घेतलेल्या गावी आयोजित करण्यात येते.या शिबिरामध्ये प्राध्यापक,विद्यार्थ्यी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसफाई,जलसंधारण,वृक्षारोपण,सर्वेक्षण,कच्चा रस्ता दुरुस्ती,शोषखड्डे,सोपा संडास,आरोग्य शिबिर,सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातुन सामाजिक विषयांवर ग्रामस्थांचे उदबोधन इ.कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेत प्रवेश देण्यासाठी नियमावली

राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्य व चिन्ह

माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी

NOT ME BUT YOU

माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे या योजनेचे बोधवाक्य आहे.ते आपणाला लोकशाही,सामाजिक बांधिलकीची जाणीव करुन देते.तसेच निस्वार्थ सेवेची गरज दाखवुन देते.या बोधवाक्यात दुसर्‍या व्यक्तिचा दृष्टीकोन विचारात घेतला पाहिजे हे सुचित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेतील चिन्ह हे ओरिसा राज्यातील कोणार्क येथील सुर्य मंदिराच्या रथाच्या चाकावर आधारित आहे.चक्र हे गतीचे प्रतिक आहे.गतिमुळे सामजिक परिवर्तन होऊ शकते व त्यासाठी आजच्या महाविद्यालयीन युवक-युवतींना राष्ट्रीय सेवा योजना हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे.त्या माध्यमातुन परिवर्तन करण्यासाठी हे चिन्ह घेतले आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे फायदे

रासेयो वैयक्तिक फायदे

सामाजिक स्तरावरील फायदे

शासकीय स्तरावरील फायदे